आता चाफा बोलणार नाही...
गावडा समाजातला काशिनाथ हा पहिला डॉक्टर. आरक्षणाचा फायदा न घेण्याचा त्याने निश्चय केला आणि खुल्या कोट्यातून त्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे शिक्षण हे त्याला कधीच मान्य नव्हते. तो विषयाला भिडायचा. रोगाची पाळेमुळे तपासायचा. त्यावरचे संशोधन व अत्याधुनिक उपचार हुडकून काढायचा.
डॉ. काशिनाथ जल्मी गेले. न बोलणार्यांच्या प्रांतात ते गेले. ते आता बोलणार नाहीत. आता ‘चाफा’ बोलणार नाही. कधीच नाही. माझं मन विदीर्ण झालं. डॉ. काशिनाथ उणीपुरी दोन दशके माझा विश्वासू सहकारी होता. रात्रंदिवस तळमळीने कार्य करणारा डॉक्टर काशिनाथ शेवटी मुका झाला. राजकीय चर्चेपेक्षा मला आठवतात त्या त्याच्यासोबतच्या साहित्यिक चर्चा.
अशीच एक पावसांतली संध्याकाळ होती. सत्तरीकडच्या गावातल्या कार्यकर्त्यांच्या बैठका आटोपून रात्रौ आठ - नऊच्या सुमारास मी डिचोलीत पोहोचलो होतो. थोडा वेळ आमचे मित्र श्रीकांत जोशी यांना भेटून पुढे जावे म्हणून त्यांच्याकडे डोकावलो, तर डॉ. काशिनाथ हातातली सिगारेट झटकीत पुढे होऊन ‘भाई, भाई’ म्हणत मला बिलगला. ती त्याची खासीयत होती. चाफ्याच्या फुलांच्या मंद सुगंधाने तिथले वातावरण धुंदावले होते. श्रीकांत गाण्याचे शौकीन. ‘अरे वा, चाफा फुललाय...’ असे मी म्हणताच ते गायला लागले -
‘चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना...’ डॉ. जल्मींस ती कविता तोंडपाठ. श्रीकांत एक कडवं गाऊन होण्याआधी तो पुढच्या कडव्याचे शब्द तो म्हणून दाखवी. कविता संपली, गायन थांबलं आणि ‘बी’ कवीचा ‘चाफा’ उरला. कोण हा चाफा? तो का रुसलाय? तो बोलत का नाही? का फुलत नाही? आंब्याच्या वनात त्याला घेऊन जाणारी, मैनेसवे गळ्यात गळे मिळवून गाणारी ती कोण? उत्कट प्रेम व्यक्त करणारी ती शेवटी इतर प्रेमीजनांना ‘विषयाचे किडे’ म्हणून साळसुदपणे का संबोधते? प्रश्नांवर प्रश्न उभे होत गेले. मी आणि काशिनाथ त्यात आकंठ बुडत गेलो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि काशिनाथ त्या कवितेच्या कंगोर्यावर भाष्य करीत होता. माझ्याशी वाद घालत होता. मध्येच चढणार्या आमच्या आवाजात श्रीकांतच्या गाण्याची लकेर मिसळत होती.
आज त्याच्या पार्थिवाला फुले वाहत असताना मला त्या ‘चाफा’ वरील चर्चेची आठवण श्रीकांतने करून दिली आणि गदगदून आले. सात - आठ वर्षांपूर्वी त्यांना पेसमेकर बसवला गेला. त्यांच्या धुंद व मनस्वी वागण्यावर निर्बंध आले. त्यात आपल्या प्रिय पक्षाचा त्याग त्याला करावा लागला. तो खचून गेला. त्याला भेटण्यासाठी त्यांच्या नव्या घरात गेलो तर त्याला कोण आनंद झाला! त्याला गाडीत घालून फेरफटका मारण्यासाठी आम्ही निघालो. काशिनाथने गाडी नदीकाठी घेण्यास सांगितले. जुवेंच्या ‘तोयटा’ ह्या नदीकाठच्या रम्य ठिकाणी तो मला घेऊन गेला. ‘विद्याला घेऊन इथेच यायचास काय रे तू?’ मी त्याला छेडले. तो प्रसन्न हसला. आमच्या गप्पा रंगल्या. राजकारणाचे विषय बाजूला कधी पडले आणि आम्ही साहित्याच्या प्रांगणात कधी शिरलो कळलंच नाही. नदीकाठ आणि तिथली मानस किती जुनी असेल? त्यानंच प्रश्न उपस्थित केला व आपणच उत्तर दिले - ‘‘आमच्या पूर्वजांनी, गावड्यांनीच ही मानस तयार केली. कोकणातले हजारो मैल लांब असलेली जमीन बांधबंदिस्ती करून कोकण वसवणारे परशुराम आमचे पूर्वज होते. समुद्र हटवून गाव वसवणारे ते गावडे. परशुरामाला आमच्या माथी का मारता?’’ त्याचा तो गंभीर प्रश्न घेऊनच मी परतलो.
गावडा समाजातला काशिनाथ हा पहिला डॉक्टर. आरक्षणाचा फायदा न घेण्याचा त्याने निश्चय केला आणि खुल्या कोट्यातून त्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे शिक्षण हे त्याला कधीच मान्य नव्हते. तो विषयाला भिडायचा. रोगाची पाळेमुळे तपासायचा. त्यावरचे संशोधन व अत्याधुनिक उपचार हुडकून काढायचा. त्यामुळे लोक म्हणायचे, ह्या डॉक्टरचा हातगुण चांगला. खरं म्हणजे त्याची जिज्ञासा त्याला मदत करायची. मला वाटतं राजकारणात तो आला नसता तर वैद्यकीत त्याने नवे शोध लावले असते!
त्याच्या विधानसभेतल्या भाषणांबद्दल खूप लिहिले जाईल, बोलले जाईल, पण त्याच्यासारखा अभ्यासू आमदार गोवा विधानसभेला कधी मिळेल का? गोवा विधानसभेत त्याच्या काळात मांडल्या गेलेल्या विधेयकांची एखाद्या निष्णात वकिलालाही लाजवेल अशा प्रकारे त्याने केलेली चिरफाड पुन्हा कोण करील का?
डॉ. लुईस प्रोत बार्बोझा यांना पक्षांतर बंदी कायद्याखाली कायमचे जायबंदी करणारा त्याचा निवाडा ह्या विषयातला अमूल्य असा दस्तावेज ठरला आहे. खरं म्हणजे त्याच्या विधानसभेतल्या भाषणांचं संकलन प्रसिद्ध करून नवनिर्वाचित आमदारांना उपलब्ध करून दिलं गेलं, तर ती डॉ. काशिनाथ जल्मींना खरी श्रद्धांजली ठरेल.
१९८०-९० च्या दशकात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने प्रचंड अशी मुसंडी मारली. १९९० मध्ये पक्ष पुन्हा एकदा सत्तेच्या उंबरठ्यावर उभा राहिला. त्यामागे डॉ. काशिनाथ जल्मी यांचे योगदान खूप मोठे होते. १९९४ मध्ये माझा पराभव झाला. डॉ. जल्मी विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले. नायलॉन ६,६ प्रकरणाचा त्यांनी शास्त्रोक्त अभ्यास केला. डॉ. रघुवीर माशेलकर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांची मते तपासली व आपला पाठिंबा नायलॉन ६,६ ला जाहीर केला. त्यामुळे जनक्षोभाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यातूनच पुढे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवाने ते खचले नाहीत, परंतु प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. वैद्यकीय महाविद्यालयात असतानाच त्यांना फुफ्फुसांचा आजार जडला होता. त्यात त्यांचे स्वच्छंदी, मुक्त जगणे त्यांना फार लवकर भेटण्यापलीकडे घेऊन गेले.
राजकारणापलीकडे त्यांचं वेगळं जीवन होतं हे अनेकांना ठाऊक नसेल. नरहर कुरुंदकर या आपल्या आवडत्या लेखकाच्या नावावरून आपल्या एकुलत्या एक मुलाचे नाव त्यांनी ‘कुरुंद’ ठेवलं. आपलं असं वेगळेपण मागे ठेवून काशिनाथ पुढे गेलाय. आपल्या कर्तृत्वाचे अंगण पुढील पिढिला आंदण देऊन गेलाय...
(आभारः दै. नवप्रभा)
congratulations to mr ramakant khalap on your birthday on this 5th of august. I am a konkani supporter and you are a marathiwadi. But recent death of dr jalmi and article of oskar rebalo opened my eyes on meaninglessness of our issues when life is so short. I thank you for all that you have done for goa. We may differ in our views but u always have good of goa in your mind. Laws drafed by you including this succession bill have changed life of not only goans but all over india. Whenever u got opportunity to be in power u made efforts to make goa a better place. Be it as finance minister of goa, law minister of goa and india, irregation minister or i t minister. In opposition you fought the currupt congress (rane) and saved goa so many times. U always help people selflessly. You are one of the few non currupt politicians left in goa. You created dayanand samajic suraksha yojana (sandesh prabhudessai is factually incorrect here) when u were dy cm of goa. u have created several institutions such as bank, bardesh bazar, mandrem school and this year mandrem commerce college. Congretulations. Politicians on their birthdays and even otherwise receive gifts, you give gift to people. Perhaps you are the last politician left who still holds the high ideals of the goas freedom movement of which you were a part. Happy birthday.