मराठी अकादमीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती
गोवा न्यूज, पणजी | 27 July 2012 22:44 ISTगोमंतक मराठी अकादमीचा कारभार सुरळीत करण्यासाठी आमदारांची सभागृह समिती नेमण्याचा निर्णय आज विधानसभेत घेण्यात आला.
आज शुक्रवार हा खाजगी विधेयके व ठरावांचा दिवस असल्याने मराठी अकादमीशी संबंधित दोन ठराव मांडण्यात आले.
त्यातील पहिला डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मराठी भवनाच्या अपूर्ण कामाविषयी मांडला.
सरकारने आपल्या यंदाच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केलेली असली तरी प्रत्यक्षात हे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
एक तर सरकाराने यासंबंधी सविस्तर विचारपूस करावी अन्यथा बांधकाम पूर्ण होईपर्यंत मराठी अकादमीचा ताबा सरकाराने घ्यावा व मराठी भवन पूर्ण झाल्यावर ती पुनश्र्च स्वतंत्ररित्या पुनर्प्रस्थापित करावी अशीही मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनीही या सूचनेस अनुमोदन दिले, परंतु सरकाराने अकादमीचा ताबा घेण्यावर विचार होणे आवश्यक असल्याचेही मत प्रदर्शित केले.
सांत आंद्रे आमदार विष्णू वाघ यांनी आणखी एका ठरावाद्वारे सरकार वेतनासाठी देत असलेले अनुदान वेगळ्या कामासाठी वापरण्यात येत असल्याचे सरकाराच्या निदर्शनास आणून दिले व याची चौकशी करण्याची मागणी केली.
सध्या गोमंतक मराठी अकादमी एका विशिष्ट कंपूच्या हातात असून तिथल्या कर्मचारी वर्गाला हक्काच्या वेतनापासून वंचित करून हा निधी इतर कार्यक्रमांसाठी वापरण्यात येत असल्याची तक्रार आपणाजवळ पोचली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे गैरप्रकार आपण चालू देणार नसल्याचाही इशारा श्री पर्रीकर यांनी दिला.
तदनंतर या सर्व गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी सभागृहाची समिती नेमण्याची शिफारस श्री वाघ यांनी केली. ती मुख्यमंत्र्यांनी लगेच मान्य केली.
very good, marathi acadamy building has been an eyesour of porvorim for so long. These marathiwadis should install a big sculpture of a crab outside the building and also change their logo to two crabs pulling each others legs.