कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांचे निधन
गोवा न्यूज खबरो | 30 December 2015 10:32 IST‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणत प्रत्येकाला जगण्याची नवीन उर्मी देणारे मराठी कविश्रेष्ठ व साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले.
वयाच्या 86 वर्षेपर्यंत साहित्य हाच श्र्वास घेऊन जगलेल्या या हाडाच्या कवीने मुंबईतील रहात्या घरी अखेरचा श्र्वास घेतला.
पाडगावकर यांचा जन्म कोकणातील वेंगुर्ला येथे १९२९ साली झाला होता.
त्यांच्या ‘सलाम’ या कवितासंग्रहासाठी १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केल्यानंतर मुंबईच्या रुइया महाविद्यालयात ते मराठी भाषा विषय शिकवत होते.
मंगेश पाडगावकर यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत आणि कित्येक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
२०१३ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता.
1980 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.
1950 ते 2006 पर्यंत त्यांचे 30 कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्याशिवाय दोन नाटके व इतरही मुक्त लिखाण त्यांनी केलेले आहे.
1959 साली प्रसिद्धा झालेल्या जिप्सी या त्यांच्या कवितासंग्रहाच्या 2005 पर्यंत एकूण 14 आवृत्त्या निघाल्या तर बोलगाणी या 1990 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहाच्या 2006 पर्यंत 16 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.
त्याशिवाय इतर अनेक कवितासंग्रहांच्या एकाहून जास्त आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
इथे क्लिक केल्यास त्यांचा थोडक्यात परिचय वाचायला मिळेल.
महाराष्ट्राला प्रेम शिकविणारा कवी हरपला, अशी भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांची अत्यंत गाजलेली ‘सलाम’ ही कविता प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
He was a great writer n poet... salute